आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी संतनगरी शेगाव येथून सोमवार, ६ जून रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी ७ वाजता ७०० वारकरी भक्तांसंगे श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ-मृदंगासह हरिनामाचा गजर, जय हरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल नामाचा नामजप गजर होईल. श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमीटर प्रवास करत आषाढ शुक्रवार, ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहोचेल. १२ जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर आषाढ शु. १५ बुधवार, १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ३ ऑगस्ट रोजी पालखी खामगावमार्गे संतनगरी शेगावला परत येईल. पालखीच्या दर्शनाकरिता होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आवश्यकतेनुसार श्रींचे पालखीच्या परिक्रमा मार्गामध्ये व मुक्कामाच्या स्थळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे पालखीप्रमुखाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. पालखीप्रमुखाचा निर्णय हा परिस्थितीनुरूप अंतिम राहील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या वारी नियोजनाच्या सूचना : पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यांनी आषाढी वारीच्या विशेष अॅपचे उद्घाटनही केले. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय व इतर सुविधा असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.