आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनस्तरावर पाठपुरावा:सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हेच माझे घर ; माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन

चिखली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हेच माझे घर आहे, त्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकासकामांमध्ये सिंदखेडराजा मतदार संघाला साहजिकच झुकते माप दिले. मात्र ते करत असताना जिल्ह्यातील इतर गावांवरही अन्याय होऊ दिला नाही. आवश्यक तेथे निधी आणि शासनस्तरावर विकास कामांसाठी सतत पाठपुरावा सुरूच ठेवल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भरोसा येथे केले.

  तालुक्यातील भरोसा येथे ४ सप्टेंबर रोजी २ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण माजी मंत्री आमदार डॉ. शिंगणे यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता गणेश थुट्टे होत्या. तर प्रमुख उपस्थितांमध्ये एकनाथ पाटील थुट्टे, गजानन वायाळ, दीपक म्हस्के, मनोज खेडेकर, डॉ. प्रकाश शिंगणे, बाळासाहेब काळे, राम खेडेकर, सुनील खेडेकर, भिकाजी खेडेकर, डॉ. विकास मिसाळ, कृष्णा मिसाळ, सुरेश भुतेकर, दीपक पुंगळे, मनोज भुतेकर, राजू जावळे, शेखर बोंद्रे, राजू भगत, नारायण चित्रोळे, अनंता गाडेकर, मधुकर वायाळ, गजानन परिहार, सचिन खेडेकर, अरुण पवार, अमोल सुर्वे, तानाजी चिकने, अमोल भुतेकर, सतीश भुतेकर, गजानन इंगळे, सत्तार पटेल, दिलीप शितोळे,भागवत सुरूशे, भिकन भुतेकर, विनायक साप्ते, दत्तू गावडे, अक्षय सुरूशे, सागर पडघान, गोपीनाथ सुरुशे उपस्थित होते. प्रस्ताविकात अंकुश थुट्टे यांनी गावात कामाचा लेखाजोखा मांडला. गजानन वायाळ व एकनाथ पाटील थुट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय खेडेकर यांनी आभार भागवत थुट्टे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...