आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास:सिंदखेडराजा- पाचाड अभिवादन यात्रा ; 15 जूनपासून करणार 429 किलोमीटरचा प्रवास

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेड राजा ते पाचाड, रायगड अशी अभिवादन यात्रा सिंदखेड राजा या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळापासून निघणार आहे. १५ जून रोजी निघणारी ही यात्रा ४२९ किलोमीटरचा प्रवास करुन पाचाड येथे मॉ जिजाऊंच्या स्मृतीस्थळी पोहोचेल. प्रथमच ही अभिवादन यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी दत्तात्रयराजे जाधव यांनी दिली. पत्रकार भवनात अभिवादन यात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ॲड. जयसिंगराजे देशमुख, सुनील सपकाळ उपस्थित होते. शिवाजीराजे जाधव म्हणाले की, १५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता जिजाऊ जन्मस्थळावरील विहिरीचे जल घेऊन आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करुन यात्रा निघणार आहे. जालना, बदनापूर, औरंगाबाद, नेवासा, घोडेगाव, अहमदनगर, सुपा येथे यात्रेचा मुक्काम राहील. १६ जून रोजी सुपा येथून शिखरापूर, लोणीकंद, वाघोली येथे स्व. पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन महाड येथे लाडवली येथील नवयुग विद्यापीठात मुक्कामी राहील. १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता पाचाड येथील जिजाऊ माँ साहेबांच्या समाधीचे लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करण्यात येईल. पाचाड कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित राहणार आहेत. या अभिवादन यात्रेत जळगाव, धुळे यासह इतर भागातून जिजाऊ भक्त या यात्रेत सहभागी होणार आहे. या यात्रेकरुंची व्यवस्था अनेक ठिकाणी जिजाऊ भक्तांनी केली आहे. प्रथमच या वर्षीपासून ही अभिवादन यात्रा सुरु करत असल्याचे शिवाजीराजे जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...