आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता बारावीच्या निकालात सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तालुक्यातील २८ ज्युनिअर व दोन एमसीव्हीसी कॉलेज मधून एकूण ३ हजार ३३३ विद्यार्थी विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३०६ परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यातील ३ हजार २३१ उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९७.७३ एवढी आहे. यामध्ये जिजामाता, सिंदखेडराजाच्या ४०५ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ४०२ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ९९.२५ एवढी आहे. एस. ई. एस. साखरखेर्डाचा निकाल ९९.१०,जीवन विकास, दुसरबीडची टक्केवारी ९९.५८ आहे. नूतन, किनगावराजाची टक्केवारी ९५.२३, महात्मा ज्योतिबा फुले, सिंदखेडराजाची टक्केवारी ९७.६३, नारायणराव नागरे, दुसरबीडची टक्केवारी ९७.४३ आहे. कै. अण्णासाहेब गायकवाड, देऊळगाव कोळची टक्केवारी ९४.४४, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू, सिंदखेडराजाची टक्केवारी १०० आहे. यशवंतराव चव्हाण, राजेगावची टक्केवारी ९६.६८ आहे. तुकाराम कायंदे, रुम्हणाची टक्केवारी ९७.५९, जीवन विकास, साठेगावची टक्केवारी ९० आहे. प्रो. जावेदखान उर्दू, दुसरबीडची टक्केवारी ९४.९३, स्वामी समर्थ, जांभोराची टक्केवारी ९९.०२ आहे. संजय गांधी, धांदरवाडीची टक्केवारी ९९ आहे. विजय मखमले, मलकापूर पांग्राची टक्केवारी १०० असून स्व. भास्करराव शिंगणे, साखरखेर्डाची टक्केवारी ९१.८६. पंडित नेहरू, मलकापूर पांग्राची टक्केवारी १००. संस्कार, शेंदूरजनचे १५७ पैकी १५४ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी ९८.०८ आहे. राजीव गांधी, सिंदखेडराजाचे १६३ पैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी ९८.१५ आहे. अटल बिहारी वाजपेयी, राहेरी बु. चे १७ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी १०० आहे. ख्वाजा गरीब नवाज उर्दू, साखरखेर्डाचे ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी १०० आहे. जानव्ही, दुसरबीडचे २३ पैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी १०० आहे. आदर्श, सिंदखेडराजाचे १५ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी १०० आहे. छत्रपती शाहू महाराज, चिंचोलीचे ६६ पैकी ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी ९८.४५ आहे. सावित्रीबाई फुले गुरुकुल ज्ञानपीठ, सिंदखेडराजाचे ५८ पैकी ५६ विद्यार्थी परीक्षेला बसले, ते सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. तर बोर्डाच्या यादीत नाव नसलेल्या तालुक्यातील एका ज्युनिअर कॉलेजचे १६ पैकी १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी ९३.३३ आहे. तालुक्यात दोन व्होकेशनल म्हणजे एमसीव्हीसी कॉलेज आहेत. त्यातील एस. इ. एस. साखरखेर्डाचे ३१ पैकी २९ विद्यार्थी परीक्षेला बसून, त्यातील २६ विद्यार्थी उत्तीर्ण व टक्केवारी ८९.६५ आहे. तर जीवन विकास, दुसरबीडचे ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.