आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतूक:‘स्किल डेव्हलपमेंट’च्या विद्यार्थ्यांचे सुयश ; 23 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजीनगर येथे पार पडलेल्या २३ व्या राज्यस्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये येथील ‘स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी’च्या यश प्राप्त केले आहे. यामध्ये सात वर्षाच्या करण शिवरकर या विद्यार्थ्यांसह ५ जणांनी गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तर ६ जणांनी सिल्व्हर मेडल व १६ जणांनी रजत मेडल प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

कोरोनानंतर नुकतीच स्पर्धांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अाहे. दरम्यान २८ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे २३ वी राज्यस्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२२ मध्ये प्रशिक्षक राजेश खांडेभराड यांच्या स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या करण शिवरकर,ऋतुजा दंदाले, गोल्ड मेडल, मैथिली तायडे, हरी रामाने, आयुष वाघमारे,अभिषेक चव्हाण, सोहम खांडेभराड,गौरव रायलकर यांनी गोल्ड मेडल तर रिद्धीमा गुप्ता, आयुषी भालेराव ,तृप्ती जाधव, साक्षी बोधणे, आरुष हटकर, नीलेश शिवरकर यांनी सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. वंश उखळकर, पार्थ गुप्ता, हर्ष कायस्थ, मिहिर उखळकर, सौरव भाग्यवंत, राघव झोरे, रुद्र बोंद्रे ,अरुण शिवरकर, आयुष वाघमारे, खुशी कायस्थ, मयुरी थेटे, जागृती जैन, अथर्व झोटे, भावना गिरी, ऋषिकेश चव्हाण, अभय सुरडकर यांनी रजत मेडलची कमाई केली आहे. दरम्यान मुख्याधिकारी अरुण मोकळ,सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी विजयी मुलांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाचे छंद जोपासावेत जेणेकरून आरोग्य ही चांगले राहील असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी केले. तर कराटे सारख्या खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांनी चंचल आणि निरोगी राहण्यासाठी मार्शल आर्ट सारख्या खेळांना जोपासणे आजच्या पिढीला गरजेचे आहेत असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...