आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत कलागुण असतात. त्याचे सादरीकरण करण्यासाठी स्नेहसंमेलन उत्तर व्यासपीठ आहे. वर्षभर चिमुकल्या वयात ज्ञानार्जन करताना विद्यार्थी अशा कार्यक्रमांची वाट बघत असतात. त्यामुळे स्नेहसंमेलन खरोखर त्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे मत ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी व्यक्त केले.
लालाजी विद्यानिकेतनवर आयोजित मुक्तछंद स्नेह संमेलनात अध्यक्षपदावरून काळे बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुमन जगताप, पुजा गुप्त, विश्वनाथ आप्पा जितकर, अशोक पाटील, प्राचार्य गौरव शेटे, ज्योत्स्ना गुप्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रिती सुरूशे यांनी मुक्तछंद स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधला कलाकार समोर यावा असा हेतू असून स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांना नवी उर्जा मिळते असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशपांडे, श्रीकृष्ण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विद्या चेके यांनी केले.
शेगाव एम्पॉवर फिजियोथेरपी क्लिनिकच्या वतीने येत्या ७ फेब्रुवारी रोजी शहरात मोफत फिजियोथेरपी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी चौकातील डॉ. राजेश सराफ हॉस्पिटलच्या कंपाउंड मधील एम्पॉवर फिजियोथेरपी क्लिनिक येथे आयोजित या शिबिरात मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, वात, संधीवात, लकवा, चेहऱ्याचा लकवा, सांधे बदलानंतरचे व्यायाम, फिजियोथेरपी मशीन आणी ड्राईकपिंग द्वारे होणार आहेत तसेच व्यायामासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सोबतच बी.पी. आणि शुगर तपासणी, कॅल्शियम आणि मल्टि व्हिटामिनची औषधे, उंची, वजन व बीएमआय तपासणी होणार आहे. या शिबिरात डॉ. प्रियल चांदूरकर व डॉ. हुमेरा तबस्सुम यांच्यासह तज्ञ डॉक्टर्स रूग्णांची तपासणी करणार आहे. तरी या शिबिराचा रुग्णानी लाभ घ्यावा, असे आवाहन एम्पॉवर फिजियोथेरपी क्लिनिकच्या संचालिका डॉ. हुमेरा तबस्सुम यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.