आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजानेफळ स्थानिक श्री सरस्वती विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जवळजवळ ८० कार्यक्रमांद्वारे कलाविष्कार सादर केला. शुक्रवारी, दि. २७ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री सरस्वती शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयाताई मिटकरी होत्या.
प्रमुख वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे उपस्थित होते. सरपंच विश्वनाथ हिवराळे, केंद्रप्रमुख किसनराव देशमुख, समितीचे सचिव श्याम गट्टानी, चंदू गट्टानी, अशोक पाटील धोटे, उपाध्यक्ष रतन दुगड, माजी प्रा. दिलीप डोमळे, नंदू कापसे, संतोष तोंडे, प्रवीण रेदासनी, संतोष नाहटा, किरण चांदणे यांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गीतगायन, नृत्य, नाटिका सादर केल्या.
त्यामध्ये श्री सरस्वती विद्यालय, श्री सरस्वती कन्या विद्यालय, श्री सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, श्री सरस्वती वरिष्ठ महाविद्यालय व श्री सरस्वती प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून शिक्षिका सुनंदा डोंगरे, सुरेखा गुजरे, गणेश सवडतकर व विशाल फितवे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एम. जाधव, कृष्णा हावरे, पुरुषोत्तम शिंदे, सुनील घुगे, प्रतीक मिटकरी, मीनल जोहरे, अमोल धोटे, प्रवीण खरात, कैलास उबाळे, किशोर पेटकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. आर. माळी, मुख्याध्यापिका अलका खंडेलवाल, मुख्याध्यापक नागेश घायाळ, प्राचार्य मापारी आदींनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.