आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड. जयश्री शेळके यांचा वाढदिवस ९ मे रोजी जिल्हाभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील कार्यक्रमांना ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.
जयश्री शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कोलवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिक्शनरी वाटप करण्यात आले. जयस्तंभ चौकातील गांधी भवनात आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग नोंदवला. मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथील सरदार वल्लभभाई पटेल धान्य गोदाम येथील महिला बचत गट मेळाव्याला महिलांची उपस्थिती होती. याच ठिकाणी घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिराचा महिलांनी लाभ घेतला. मोताळा तालुक्यातील चावर्दा येथील कुष्ठरोग धाममधील रुग्णांना साहित्य वाटप करण्यात आले.
म्हसला बुद्रुक येथील गतिमंद विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प आश्रमात भोजन दान करण्यात आले. अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून जयश्री शेळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयश्रीताई शेळके मित्रमंडळ, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन, राजर्षी शाहू परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.