आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस हा जनतेचा रक्षक आहे. असे असताना परिस्थिती हाताळताना त्याला अनेकदा रोषाला सामोरे जावे लागते. त्याची भूमिका मात्र सकारात्मक असते. आलेल्या तक्रारीवरून कारवाई करावीच लागते. असे असताना आपलं कर्तव्य निभावताना जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.
साखरखेर्डा पोलिस ठाण्यात दिवंगत ठाणेदार स्व. सचिन प्रताप शिंदे यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य भवनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते, स्व. सचिन शिंदे यांचे वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रताप शिंदे, आई व भगिनी, पाठखळ (सातारा) हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी हे काम लोकवर्गणीतून करताना प्रत्येकाने खारीचा वाटा उचलल्याचे सांगितले. तसेच सप्तखंजेरी वादक संदिपपाल महाराज यांचा व्यसनमुक्ती व सामाजिक ऐक्य राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच रक्तदान शिबिरही घेण्यात आले.
यामध्ये 25 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला जि.प.सदस्य राम जाधव, बुलडाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने, व्यवस्थापक जगन्नाथ काळे, सरपंच दाऊद सेठ कुरेशी, माजी सरपंच महेंद्र पाटील, सेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबुराव मोरे, बुलडाणा अर्बनचे संचालक किशोर महाजन, माजी सभापती राजेश ठोके, सुनील जगताप, सैय्यद रफिक, भाजपचे रावसाहेब देशपांडे, अर्जुनराव गवई, शुभम ठाकूर, मंगलसिंग राजपूत, माजी सरपंच कमलाकर गवई, विकास इंगळे, कैलास दायमा, कय्युम मेंबर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष दसरे यांनी तर आभार प्रदर्शन पो. कॉ. स्मिता मानघाले देशमुख यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.