आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शहरातील विविध समस्यांचा निपटारा करा; आम आदमी पक्षाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोकाट जनावरांसह कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, इंदिरा नगरातील प्रवेश द्वाराचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे, नागसेन सोसायटीमधील रस्त्याचे काम करण्यात यावे, भीमनगर मधील नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने आज ८ सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांसह कुत्र्याचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट कुत्रे लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांसह कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, इंदिरा नगरातील प्रवेश द्वाराचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात यावे, नागसेन सोसायटीमधील रस्त्याचे काम करण्यात यावे, यासह इतर समस्यांचा निपटारा करण्यात यावा, अन्यथा पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपचे रवि मोरे, शेख इरफान शेख बुढन, संतोष खंडागळे, विजय सरदार व विष्णू दांडगे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...