आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या विविध समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज ५ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना दिला आहे. तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आली. त्यामुळे शासनाचे पिक विमा कंपनीला समज देऊन पीक नुकसानी प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, तसेच वीज कंपनीकडून लोडशेडिंग नावाखाली वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतीला किमान आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार, उपप्रमुख कैलास कडाळे पाटील, माजी तालुका प्रमुख जगन्नाथ मिसाळ, भैय्या घिवे, प्रशांत इंगळे, प्रमोद भारसाकळे, गोपाल पाटील, प्रमोद गडे, पंकज मिसाळ, वैभव आखरे, विलास मानकर, शिवशंकर पुंडे, सुरेश राऊत, सुजित मिसाळ, नीलेश झाडोकार यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.