आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा:जिल्ह्यात 1 लाख 82 हजार हेक्टर जमीनीवर रब्बीची पेरणी

गिरीश पळसोदकर | खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागाने रब्बी हंगाम २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात २ लाख २७ हजार २१४ हेक्टर जमीनीवर रब्बीतील विविध पिकांचे नियोजन केले होते. यापैकी १ लाख ८२ हजार ६४३ हेक्टर जमीनीवर रब्बीच्या पिकांची पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८० टक्के आहे. उर्वरीत पेरणी लवकरच पूर्ण होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. रब्बीचे नियोजन २ लाख २७ हजार हेक्टर असले तरी यंदाच्या पावसाळ्यात व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले, त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजच्या घडीला जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा साठा आहे.

हिच स्थिती जिल्ह्यातील विहिरींची आहे : रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी विहिरींमध्ये मुबलक पाणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांजवळ रब्बीचे व भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतात विहिर नाही, अशा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या लघु व मध्यम प्रकल्पांतून पाणी घेऊन रब्बीची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, तर काहींनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत गहु आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी गहु आणि हरभऱ्यासह कांदा आणि भाजीपाल्याची सुद्धा लागवड केली आहे. अद्याप काही पेरण्या बाकी असून, त्या जानेवारीपर्यंत आटोपतील असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गत १५-२० दिवसापासून थंडी जाणवत आहे. ही थंडी हरभरा पिकाच्या दृष्टीने पोषक असल्याचे शेतकरी वर्गात बोलल्या जाते. वातावरण बदलामुळे जिल्ह्यात थंडाचा जोर वाढला असन, हा बदल हरभरा, गहू व अन्य पिकांच्या उत्पन्नवाढसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

गहू, हरभऱ्यासाठी पोषक वातावरण
रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी विहिरींमध्ये मुबलक पाणी आहे. परंतू शेतकऱ्यांजवळ रब्बीचे व भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतात विहिर नाही अश्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या लघु व मध्यम प्रकल्पातून पाणी घेऊन रब्बीची पेरणी केली आहे. मी गत २० ते २५ वर्षापासून गव्हाचे उत्पादन घेत आहे. सद्या पडणारी थंडी ही गहू व हरभरा पिकासाठी पोषक आहे.सतीष जयस्वाल, शेतकरी वरखेड खुर्द.

बातम्या आणखी आहेत...