आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी बुलडाणा तालुक्यात खरीप हंगामातील एकूण ५१ हजार ११० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४८ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात येणार अाहे. तर २ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर मका व त्याखालोखाल १ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड करण्यात येणार आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्याने मृग नक्षत्रात पेरणी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्यामुळे सर्वत्रच पेरणी पूर्वी मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. पावसाळ्याचे आगमन येत्या सप्ताहभराच्या अंतरावर असून तालुक्यात खरिपाच्या पेरणीपूर्व तयारी शेतकरी करत आहेत. गेल्या हंगामात कृषी उत्पादन आणि कृषी मालाला मिळालेला भाव यामुळे यावर्षी कृषी क्षेत्रावर निश्चित करण्यात आलेल्या पूर्ण क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे.बुलडाणा तालुक्यात यावर्षी ५५ हजार ११० हेक्टरवर खरिपाची पेरणी शेतकरी करणार असून, यासाठी शेतकरी आपल्या शेतातील अंतर्गत मशागत करण्यात आणि बांधबंदिस्ती, जनावरांच्या निवारा तथा वैरण साठवणूक आदी कामे करण्यात व्यस्त आहेत. मागील वर्षी कृषी क्षेत्रात शेती उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊन त्या प्रमाणात शेतमालाला चांगले भाव मिळाल्याने तालुक्यात कृषी क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. खालावलेले कृषी मालाच्या दरामुळे अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली होती. मात्र आज शेतीमधून दर्जेदार उत्पादन आणि कृषी मालाचे वाढते भाव यामुळे शेतकरी स्वतः शेती व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य देत आहे. दरम्यानच्या काळात सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात बुलडाणा तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा बुलडाणा तालुक्यातील नियोजित खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रातील ५१ हजार ११० हेक्टर मध्ये होणाऱ्या पेरणीसाठी पिकांच्या प्रतवारी मध्ये ज्वारी ९० हेक्टर, मका २ हजार ६७० हेक्टर, तूर १ हजार ६५० हेक्टर, मूग २३० हेक्टर, उडीद ७८० हेक्टर, भुईमूग ८० हेक्टर, तीळ २ हेक्टर,सोयाबीन ४८ हजार २४० हेक्टर, कपाशी १ हजार ३७० हेक्टर या पध्दतीने तालुक्यात खरिपाची पेरणी शेतकरी करणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनात आराखडा तयार करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.