आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन चोरून‎ नेले:चोरट्यांकडून सोयाबीन चोरीचे सत्र सुरूच‎

मेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली तालुक्यातील मेरा‎ बु. येथे १४ डिसेंबर रोजी चोरट्यांनी‎ जगदीश विष्णू पडघान यांच्या‎ घरातून २० पोते सोयाबीन चोरून‎ नेले होते. तर आता अंत्री खेडेकर‎ येथील सोपान खेडेकर यांच्या‎ घरासमोरील ओट्यावरून तीन पोते‎ सोयाबीन चोरून नेण्यात आले.‎ अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत‎ गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी‎ धुमाकूळ घातला आहे.

परिसरात‎ चोऱ्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस‎ वाढत चालले आहे. १४ डिसेंबर‎ रोजी जगदीश विष्णू पडघान यांच्या‎ शेतातील घराचा दरवाजा तोडून २०‎ पोते, गुंजाळा येथील नितीन मोरे‎ यांचा १६ हजाराचा मोबाइल, शेती‎ साहित्य, कवढळ येथून बकऱ्या‎ अशा घटना सातत्याने घडल्या‎ आहेत. तर आता अंत्री खेडेकर येथे‎ सोपान खेडेकर यांच्या घरासमोर‎ ओट्यावरील तीन पोते चोरीला गेले.‎ तरी पोलिसांनी चोरट्यांना आवार‎ घालावा.

चोरट्यांचा बंदोबस्त‎ करावा अशी मागणी सरपंच सचिन‎ खेडेकर , ग्रा. प.उपसरपंच भास्कर‎ मोरे, सदस्य भिका पाटील, मदन‎ मोरे, दिलीप मोरे, पोलिस पाटील‎ रामदास मोरे, सोपान खेडेकर,‎ जगदीश पडघान, नितीन मोरे,‎ सरपंच दीपक केदार आदी‎ गावकऱ्यांकडून करण्यात आली‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...