आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव:बुरशीजन्य रोगामुळे चिखली तालुक्यातील 68 हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

चिखली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यामध्ये सोयाबीन पीक लागवडी खालील क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. सध्यास्थितीत सोयाबीन पिकाला शेंगा लागलेल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा या भरत आहेत. सध्या नैसर्गिक हवामानातील झालेल्या बदलामुळे सोयाबीन पिकांवर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने या संसर्गजन्य रोगामुळे तालुक्यातील ६८ हजार हेक्टर वरील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.

चिखली तालुक्यातील मेरा व शेळगाव आटोळ महसूल मंडळामध्ये खरिपाची पेरणी लवकर झालेली असल्याने या भागातील सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत. या भागातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी ऐकायला मिळत आहेत. मागील कित्येक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार सोयाबीन पिकावर शेंग करपा व इतर बुरशीजन्य जे रोग असून सदर रोगांचा फटका पिकाला बसण्याची दाट शक्यता असते. रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा रोगट पावसामध्ये म्हणजेच रिमझिम पावसामध्ये जास्त होतो. जर पाऊस मोठा असेल तर हा रोग धून जाण्याची शक्यता असते. पण तसे बघितले तर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी सध्या रिमझिमच पाऊस चालू आहे.

अशा ठिकाणी हा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगामुळे झाडाची पानेही सुरुवातीच्या स्थितीमध्ये पाण्यात भिजल्यासारखी दिसतात. त्यानंतर हिरवट तपकिरी होऊन पानांचा रंग हा नंतर तपकिरी किंवा काळा रंगाचा दिसून येतो. पाने भाजली जातात, जास्तच पाऊस किंवा जास्त दमट हवामानामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा होतच राहतो. या रोगामुळे झाडाची पानेही सुरुवातीच्या स्थितीमध्ये पाण्यात भिजल्यासारखी दिसतात. त्यानंतर हिरवट तपकिरी होऊन पानांचा रंग हा नंतर तपकिरी किंवा काळा रंगाचा दिसून येतो. तज्ञांच्या मते जास्तच पाऊस किंवा जास्त दमट हवामानामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

सोयाबीन पिकावरील रोगाच्या नियंत्रणाचा विचार केला तर सोयाबीन पिकावरील रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, पानावरील ठिपके, शेंग करपा सोबतच इतर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर (६५ %) ५०० ग्रॅम प्रति एकर आणि पूर्व मिश्रित बुरशी नाशक टेब्युकोनॅझोल (१० %) किव्हा पायरोक्लोस्ट्रोबीन (२०%) १५० ते २०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९%) २५० मिली किंवा इपिक्साकोनाझोल ५ टक्के + पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ %(पूर्वमिश्रित बुरशीनाशक) ३०० मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिक्स करू याची फवारणी करावी. किंवा शेतामधील प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून टाकावी आणि त्या झाडाची दुसरीकडे कोठेतरी विल्हेवाट लावावी ती झाडे शेतात पडता कामा नये. असे झाल्यास रोग पुन्हा नवीन झाडावरती वाढू शकताे.

रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा पिकावरील नियंत्रणासाठी शेतातून रोगग्रस्त झाडे उपटून पिशवीमध्ये भरून ती झाडे शेताच्या बाहेर काढावी व नष्ट करावीत. ती झाडे बांधावरती टाकू नये. केवळ हेच उपाय या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो असे तज्ञांचे मत आहे. देऊळगाव धनगर, भरोसा, कोनड खु, मिसाळवाडी, पिंपळवाडी, मेराखुर्द, मलगी, रोहडा या भागातील सोयाबीन पिकावर हा रोग आढळून येत असल्याचे शेतकरी समाधान घुबे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...