आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमी:बारलिंगा येथे बौद्धांच्या समशानभूमीसाठी जागा देण्यात यावी ; जागा न दिल्यास आंदोलन करण्यात येईल,

साखरखेर्डा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथे बौद्ध समाजासाठी समशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अतुल भुसारी यांनी १३ जून रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे. बारलींगा येथे मृत झालेल्या व्यक्तीला स्मशान भूमित नेण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील बौद्ध समाज बांधवांसाठी स्मशानभूमीसाठी जागा नाही. त्यामुळे या समाज बांधवांना मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समाजाची हेळसांड होवु नये यासाठी गावाशेजारी असलेल्या गट नंबर चाळीस मधील ई क्लास जमीन शिल्लक आहे, त्यातून बौध्द समाजासाठी स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल दिनकर भुसारी यांनी तहसीलदारांकडे केली आहे. जागा न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...