आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाजवळील घटना:भरधाव जाणाऱ्या प्रवासी ऑटोची दुभाजकास धडक ; विवाहिता ठार, सहा जखमी

जानेफळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समोरील कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने प्रवासी ऑटो दुभाजकावर आदळून पलटी झाला. या अपघातात जबर मार लागल्याने एक ३७ वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना जानेफळ रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

शहरापासून जवळ असलेल्या गवंढाळा येथून काही महिला ऑटोने मेहकर कडे येत होत्या. समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ ॲटोच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्यामुळे ऑटो दुभाजकावर जावून आदळला व पलटी झाला. या अपघातात ज्योती ओंकार पडघान वय ३७ रा. गवंढाळा ही महिला ठार झाली. तर सुनीता सदानंद खरात, कौशल्य राजू खरात, वनिता समाधान पडघान, जयश्री सतीश खरात, मंगला गजानन खरात व सुषमा नंदकिशोर जाधव या सहा महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...