आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबनाची कारवाई:ग्रामसेवकाच्या निलंबनासाठी डोणगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; चोर संबोधणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल

डोणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोणगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांनी मागील काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले. त्यातून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र तरी देखील प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी डोणगाव बंदचे आवाहन केले होते. या बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने दुपारी बारापर्यंत कडकडीत बंद ठेवली होती.

ज्ञानेश्वर चनखोरे यांची गावकऱ्यांना चोर म्हणून संबोधणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मतदाराला चोर म्हणून, नवख्या महिला सरपंचाला कशा पद्धतीने भ्रष्टाचार करायचा याची शिकवण ते देत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओवर गटविकास अधिकारी यांनी चनखोरे यांना फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली. म्हणून डोणगावातील भ्रष्टाचार विरोधी नागरिकांनी ४ सप्टेंबर रोजी दवंडी देत चनखोरेंच्या निलंबनासाठी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. जनतेच्या या विनंतीला प्रतिसाद देत डोणगावातील सर्वच दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करत तत्काळ निलंबनाची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...