आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेचा छळ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आंबेटाकळी येथील महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला मारहाण केल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. प्रकरणी १९ डिसेंबर रोजी हिवरखेड पोलिसांनी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विवाहिता आरती सागर होने (२२) रा. दांगर पाटील नगर शिवणी ता. पुणे ह. मु.आंबेटाकळी या महिलेने हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सासरकडील सागर भीमराव होने, मानता भीमराव होने, माधुरी भीमराव होने व शशिकला रामदेव गव्हाळ रा. शिवणी पुणे यांनी संगनमत करुन पैशांची मागणी केली. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच मारहाण करुन शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...