आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:एसटीची दुचाकीला धडक, चिखलीतील घटनेत 1 ठार

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव एस.टी.ने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना चिखली शहरातील चिखली- देऊळगावराजा रस्त्यावरील ट्रॅक्टर शोरूम समोर सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. सतीश परमेश्वर आव्हाळे (३५), रा. सायाळा, ता. सिंदखेडराजा, ह.मु. सहारा पार्क, चिखली असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

सतीश आव्हाळे हे चिखली येथे एका कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीला होते. काम आटोपून घराकडे जात असताना औरंगाबादवरून चिखलीकडे येणाऱ्या चिखली आगाराच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आव्हाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार होत चिखली पोलिस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...