आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • St Workers Death । Suicide । The Death Of 'that' ST Employee Who Was Poisoned, Took His Last Breath During Treatment At Akola; The Movement Is Likely To Simmer Further

एसटी कर्मचारी संप:विष प्राशन केलेल्या 'त्या' एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, अकोला येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास; आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता

खामगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचान्यांचा मागील 12 दिवसापासून संप सुरू आहे. संपा दरम्यान विष प्राशन केलेल्या खामगाव आगारातील सहाय्यक मॅकेनिक विशाल प्रकाश अंबलकार याचा उपचारादरम्यान अकोला येथे 17 नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला.

यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार असल्याचे समजते. एस.टी. कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू आहे. मात्र तरीही शासनाला जाग येत नाही. संप चिघळत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत असून राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न तसेच आत्महत्या केलेल्या आहेत.

तर राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करीत 16 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास खामगाव आगारातील सहाय्यक मॅकेनिक विशाल प्रकाश अंबलकार रा.माटरगाव या अविवाहित तरुणाने त्याच्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

मात्र प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले होते. दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विशाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा एस टी कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला लढा यापुढे चिघळणार असल्याचे समजते.

दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही सुरूच होता. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातही हे आंदोलन तीव्र होत असून बुधवारपर्यंत 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे.

तर 42 कोटींवर महसूल बुडाला आहे. आणखी काही दिवस प्रवाशांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, संपाच्या काळात मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक 10 कोटी 50 लाखांचा महसूल बुडाल्याचे आकडेवारीवरून समोर येते.

परभणी जिल्ह्यातील 4 आगारांतील 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. मागील दहा दिवसांत 100 टक्के बस बंद होत्या. हा संप टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. कर्मचारीही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड व पाथरी आगारातील प्रत्येकी 5, जिंतूरमधील 7, परभणीतील 8 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

परभणी जिल्ह्यातील 4 आगारांतून दिवसाला सरासरी 25 लाखांचा महसूल मिळतो. महामंडळात प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिकी आणि प्रशासकीय असे एकूण 1 हजार 400 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या यातील प्रशासकीय आणि यांत्रिक स्तरावरील जवळपास 40 ते 45 कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याची माहिती परभणीचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...