आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • St Workers Suicide | Vidarbha| Poisoning Was Done For Fear Of Suspension; The Clear Mention Of The Deceased Vishal Ambalkar In His Pre death Speech, The Agitation Will Simmer

राज्य शासनाचा निषेध:निलंबनाच्या भितीपोटी केले होते विषप्राशनच; मृतक विशाल अंबलकार यांचा मृत्यूपूर्व जबानीत स्पष्ट उल्लेख, आंदोलन चिघळणार

प्रतिनिधी | खामगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप असून संपात सहभागी असल्याने निलंबनाच्या भीतीपोटीच आपण विषप्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचे एस.टी. कर्मचारी मृतक विशाल अंबलकार यांनी मृत्यूपूर्वी जबानीत म्हटले आहे. विशाल अंबलकार याच्यावर गुरुवारी त्याच्या माटरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांचा मागील १२ दिवसांपासून संप सुरू आहे. संपा दरम्यान विष प्राशन केलेल्या खामगाव आगारातील सहाय्यक मेकॅनिक विशाल प्रकाश अंबलकार याचा उपचारादरम्यान अकोला येथे १७ नोव्हेंबर च्या रात्री मृत्यू झाला.

यामुळे आता एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार असल्याचे समजते. एस. टी. कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू आहे. मात्र तरीही शासनाला जाग येत नाही. संप चिघळत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत असून राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आंदोलना दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न तसेच आत्महत्या केलेल्या आहेत. तर राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करीत १६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास खामगाव आगारातील सहाय्यक मेकॅनिक विशाल प्रकाश अंबलकार रा.माटरगाव या अविवाहित तरुणाने त्यांच्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले होते. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विशाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेचा एस.टी. कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मृतक विशाल अंबलकार यांचे प्रेत खामगाव येथील एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू असलेल्या मंडपात आणण्यात यावे यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांची मागणी होती. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मृतकाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळगावी नेण्यात आले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खामगाव येथील आंदोलन मंडपात विशाल यांस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

विलीनीकरण केल्याशिवाय आता माघार नाहीच

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत ३९ कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे आतापर्यंतचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा ठाम निर्णय एस. टी. कर्मचाऱ्यांनी घेतला. कर्मचाऱ्यांविरोधात राज्य शासनाचे दडपशाही धोरण मोडून काढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेतला जाणार नसल्याचा विश्वास एस.टी. कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

आंदोलना दरम्यान राज्यात ३९ कर्मचाऱ्यांनी केल्या आत्महत्या
खामगाव आगारात सहाय्यक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेले विशाल अंबलकार यांच्यावर माटरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माटरगावातून प्रेतयात्रा जात असताना तसेच स्मशानभूमीत राज्य शासनाच्या विरोधी घोषणाबाजी करून निषेधार्थ नारे लावण्यात आले. यावरून एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप आता पुढे काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...