आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान:रमजान महिन्यातील उपवासाला प्रारंभ; शहरातील मशिदींमध्ये आकर्षक सजावट

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्र दर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याची सुरूवात झाली आहे. पहिला रोजा ३ एप्रिल रोजी होता. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदींमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मगरीची नमाजा पूर्वी रोजा सोडावे लागतो याला इफ्तार, असे म्हणतात तसेच इशाची नमाज मध्ये विशेष २० रकात तराहवीची नमाज पठण करावे लागते यात हाफिज साहेब महिनाभर संपूर्ण कुराणांचे पठन करतात फजरच्या अजान पूर्वी सेहरी करुन रोजा सुरु करण्यात येतो.

येथील मस्तान चौकातील फाटकपुरा मस्जिद वर विद्युत रोषणाई करुन सजावट करण्यात आली आहे. खजुराचे अनेक प्रकार उपलब्ध झाले असून सुत्तर फेणी, शेवाई सरबत आदी दुकाने लागली आहे. यंदा कडक उन्हात रमजान महिना आला आहे. शहरातील नागरिकांनी रमजानमधील रोजाची तयार पूर्ण केली असून नागरिकांत उत्साह आहे.

बातम्या आणखी आहेत...