आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:‘आत्मनिर्भर बनण्यासाठी छोटे उद्योग सुरू करावे’; प्रा.शाम फाफट यांनी केले आवाहन

जळगाव जामोद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मनिर्भर बनण्यासाठी लहान लहान उद्योग सुरू करावे. असे आवाहन प्रा. शाम फाफट यांनी केले. स्टार्ट अप इंडियाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भर भारत आणि क्रिप्टो करन्सी या विषयी आवश्यक असणाऱ्या घटकाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात ३० मार्च रोजी करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना त्यांनी स्टार्ट अप इंडिया कसे सुरू करायचे व आत्मनिर्भर कसे बनावे, तसेच क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, व त्याचे फायदे तोटे काय, या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व संगणक विभाग यांनी संयुक्तिक रित्या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.डॉ राम देशमुख होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा श्याम फाफट हे होते.

तर मंचावर प्रा. गिरीश माई, प्रा. ऋषिकेश विप्रदास, प्रा.विनोद बावस्कार, प्रा.गणेश जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य राम देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत तायडे यांनी तर संचलन चैताली उमाळे व अतिथीचा परिचय अश्विनी देवकर हिने तर आभार गायत्री दाभाडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रज्ज्वल भारसाकडे,अश्विन करंगळे, हर्षद धर्मे, प्रतीक्षा सातव, मुक्ता तराडे, तुप्ती वावगे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...