आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:किनगाव जट्टू ते बिबी रस्त्याचे काम त्वरित सुरू करा; अन्यथा आंदोलन

लोणार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किनगाव जट्टू ते बिबी रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवानंद सानप यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला अंतर्गत येत असलेल्या तालुक्‍यातील बिबी ते किनगाव जट्टू या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे प्रवाशांसह वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे तातडीने काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेत या रस्त्याच्या कामाला मंजुरी देवुन या रस्त्याचे काम सुधीर कन्ट्रस्क्शन, नागपूर या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने काम सुरू केले होते. परंतु जेमतेम ४० ते ५० टक्‍के काम झाल्यानंतर या रस्त्याचे काम कंपनीने बंद पडले.

त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना या मार्गावर तारेवरची कसरत करावी लागत आहे, विशेष म्हणजे या मार्गाच्या दोन्ही बाजूने खोदकाम केल्यामुळे अनेक वेळा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत. शिवाय या रस्त्यावर कुठल्याच प्रकारे सुचना फलक लावण्यात आले नाही. खोदून ठेवलेल्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडून ती आजूबाजूच्या शेतातील पिकांवर बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या धुळीमुळे खंडाळा, किनगाव जट्टू व बीबी येथील नागरिकांना श्वसनाचा व डोळ्याचा त्रास होत आहे.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील याच मार्गाने जावे लागते. त्यांना सुध्दा या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संत गजानन महाराज पालखी याच मार्गावरून जात असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंडळाने सुधीर कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई करावी. तसेच बंद पडलेले काम दुसऱ्या कंत्राटदारास देऊन ते तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवानंद सानप यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...