आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षभरात चिखली मतदारसंघातील १२६ गावांमधील ४५५ किलोमीटर शेत पाणंद रस्त्यांना मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मान्यता मिळाली आहे. परंतु, यंत्रणांच्या उदासीनतेमुळे त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे सर्व अडचणी दूर करून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशा सूचना आमदार श्वेता महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. शनिवारी, दि. ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी.तुम्मोड यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मातोश्री शेत पाणंद रस्त्यांची ही आढावा बैठक झाली.
काम न करणाऱ्यांवर कारवाई : नंदकुमार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता दिसत नाही. जनतेची कामे व्हावीत यासाठी हवी तेवढी लवचिकता स्वीकारून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. केंद्राचा एवढा मोठा निधी मिळूनही राज्यामध्ये मनरेगाची कामे अपेक्षित प्रमाणात होत नाही. मातोश्री पाणंद रस्ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने आणि अधिकाऱ्यांमधील बरेच जण भूमिपुत्र असल्याने त्यांनी मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. याबाबत जो कर्मचारी किंवा अधिकारी काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी आढावा बैठकीदरम्यान भ्रमणध्वनीवर बोलताना दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी माचेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) अरुण मोहोड, कार्यकारी अभियंता राऊत, ठाकरे, गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाखले, सरिता पवार, उपअभियंता दीपक चिंचोले, बिहाडे, भाजप तालुकाध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, भाजप शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, राजू चांदा, विष्णू वाघ, आस्तिक वारे, संदीप सोनुने यांची उपस्थिती होती.
आढावा बैठकीतच "रोहयो''च्या प्रधान सचिवांशी संपर्क
आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी मातोश्री पाणंद रस्त्यांमध्ये येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. यावेळी आमदार श्वेता महाले यांनी रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंदकुमार यांना फोन लावून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.