आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:गोदाम बांधकामासाठी शेतकरी, लाभार्थींकडून अर्ज घेण्यास सुरूवात

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, गळीत धान्य पिके अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकामासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.गोदाम बांधकामाचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघांना होणार आहे. यासाठी १८ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावा करावा लागणार आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यांमध्ये योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे.

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार कंपनी लाभास पात्र राहणार आहे. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदायगी होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...