आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांची माहिती‎:बुलडाण्यात 14 ते 16 एप्रिल दरम्यान‎ रंगणार राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा अर्बन महाराष्ट्र राज्य‎ अंडर १७ ओपन व महिला फीड‎ सिलेक्शन चेस चॅम्पियनशीप २०२३‎ चे बुलडाणा येथे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎ ही अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धा‎ सहकार विद्या मंदिर बुलडाणा येथे‎ १४ ते १६ एप्रिल दरम्यान होणार‎ आहे. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक‎ पंजाब राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय‎ स्पर्धेत सहभागी होणार असल्याची‎ माहिती बुलडाणा अर्बनचे‎ कार्यकारी संचालक तथा स्पर्धेचे‎ आयोजक डॉ. सुकेश झंवर यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिली. येथील बुलडाणा अर्बन‎ रेसिडेन्सी क्लास येथे सोमवारी,‎ आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी‎ ही माहिती दिली.

यावेळी स्पर्धेचे‎ सचिव अंकुश रक्ताडे यांची‎ उपस्थिती होती. यावेळी डॉ. झंवर‎ म्हणाले की, या स्पर्धेसाठी‎ ग्रॅण्डमास्टर अनिल कुमटे व‎ स्वप्नील भोपळे हे येणार आहेत.‎ जागतिक स्तरावरील स्पर्धा‎ बुलडाण्यात व्हाव्यात असे‎ आपल्याला वाटते. सुवर्ण, रजत व‎ कांस्य पदक विजयी उमेदवारांना‎ दिले जाणार आहे.‎ ओपन व मुलींचा गट असे दोन्ही‎ मिळुन ३६ हजार रुपयांचे बक्षीस‎ राहणार आहे. १४ एप्रिल रोजी‎ उद्घाटन झाल्यानंतर पहिला राउंड‎ १०.३० वाजता होणार आहे. या‎ दिवशी तीन राउंड होतील. १५‎ एप्रिल रोजी तीन राउंड होतील व १६‎ एप्रिल रोजी दोन राउंड झाल्यानंतर‎ बक्षीस वितरण होणार आहे.‎