आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कुंभार समाज सामाजिक संस्थेचे विविध मागण्यांसाठी निवेदन ; सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही

खामगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत शिरोमणी गोरोबाकाका माती कला बोर्डचे संचालक मंडळ घोषित करून कामकाज त्वरित सुरू करण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांबाबत कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, मागील अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कुंभार समाजाच्या एकाही प्रलंबित मागणीबाबत या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील सकल कुंभार समाजाच्या वतीने सरकारच्या कुंभार समाज विरोधी धोरणांच्या निषेध करून कुंभार समाजाचा एन.टी. प्रवर्गात समावेश करावा, संत गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर-ढोकी जिल्हा उस्मानाबाद या तीर्थ क्षेत्रास देहू आणि आळंदी प्रमाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात यावे, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, कुंभार समाजाला मातीवर आकारणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर कुंभार समाज सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष विनोद लाहुडकर, रामेश्वर कापडे, रवींद्र टाके, हरिदास बावस्कर, ज्योतीताई श्रीराम बावस्कर, अंबादास थोटे यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...