आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जीव धोक्यात घालणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा; प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे

देऊळगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य खूप सुंदर आहे ते जपा. तसेच जीव धोक्यात घालणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा, असे आवाहन प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी केले. येथील श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तक्रार निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून एड्स जनजागृती व आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी प्रमुख पंकज खरे, भरत राठोड, मातृभूमी फाउंडेशनच्या पूनम मावळे, राधिका इंगळे, ढोकणे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी पंकज खरे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एड्स या रोगाविषयी तसेच त्यापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले. तर पूनम मावळे व राधिका इंगळे यांनी उपस्थित सर्व रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविकांना एड्सविषयी असणारे समज गैरसमज, एड्स होण्याची कारणे याविषयी माहिती दिली. विवाहपूर्व एड्स चाचणी करणे किती महत्वाचे आहे. हे त्यांनी पटवून दिले. यावेळी एचआयव्ही तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन ग्रंथपाल डॉ. उमेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह ७५ विद्यार्थ्यांनी या शिबिरात एचआयव्ही तपासणी करुन घेतली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली तेलगड यांनी केले. तर अतिथी परिचय रासेयो सह कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने यांनी दिला. सूत्रसंचालन रासेयो महिलांसह कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळवे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...