आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजूर वर्गाला न्याय देण्याची मागणी:‘कामगारांना होणारा त्रास थांबवा, अन्यथा आंदोलन’

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा नगरपंचायत कार्यालया मार्फत कामगार नोंदणी अधिकारी यांच्या कडे मजूर व कामगार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेले नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी होत असलेला त्रास दूर करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहरातील मजुर व कामगारांनी २८ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे मोताळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी दिला आहे.

मोताळा नगरपंचायत ही क वर्ग दर्जाची नगरपंचायत आहे. त्यानुसार त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे कामगार व मजुरांना मलकापूर, बुलडाणा नगर परिषदेला लागू असलेले नियम व निकष लाऊन त्याचा आर्थिक व मानसिक छळ करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन दुसऱ्या गावांत अल्पशा मोबदल्यात मोलमजुरी करणाऱ्या मजूर वर्गाला न्याय देण्यात यावा, अन्यथा मजूर व कामगारांच्या वतीने येत्या ५ ऑगस्ट रोजी आंदोलन करू, असा इशारा कामगारांनी दिला आहे. निवेदनावर रहिम शाह, शे. साबीर, मो. फैजान, शे. साबीर अ. शकुर, मेहबूब शाह, अजहर शाह, अमोल इंगळे, सय्यद तन्वीर व कामगाराच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...