आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎‎:बुलडाणा येथील अवैध‎ धंदे त्वरीत बंद करा‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अवैध धंदे त्वरीत बंद‎ करा, असे निवेदन रिपब्लिकन‎ सेनेचे वतीने बुलडाणा शहर पोलिस‎ ठाणेदार यांना देण्यात आले.‎ , शहरातील ज्या परिसरात‎ जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस‎ अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद‎ कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय‎ आहे. त्याच परिसरात वरली‎ मटक्याचे धंदे राजरोसपणे सुरू‎ असल्याने या कार्यालयात‎ येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना‎ कायदा सुव्यवस्थेची होणारी‎ पायमल्ली पाहून खूप दुःख होत‎ आहे, या अवैध धंद्यांमुळे‎ नागरिकांना त्रास सहन करावा‎ लागतो.

इतक्या राजरोसपणे सुरू‎ असलेले अवैध धंदे शहरातील‎ पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून‎ उघड्या डोळ्याने पाहत आहे. या‎ अवैध धंद्यांमुळे बुलडाणा शहराची‎ शांती, अस्मिता वाईट होत आहे.‎ शहरातील अवैध धंदे त्वरीत बंद‎ करा अन्यथा जिल्हा अधिकारी‎ कार्यालय व पोलिस अधीक्षक‎ कार्यालय येथे रिपब्लिकन सेनेच्या‎ वतीने आंदोलन करण्यात येईल‎ असा इशारा देण्यात आला. निवेदन‎ देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा‎ अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा‎ उपाध्यक्ष ब्रम्हा साळवे, महासचिव‎ सलीमभाई, प्रसिद्धी प्रमुख शेख‎ मुख्तार, तालुकाध्यक्ष श्याम लहान‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...