आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मोताळा तालुक्यातील अवैध धंदे बंद करा; तालुका काँग्रेसची मागणी

मोताळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या सोबतच तालुक्यात अवैध देशी व विदेशी दारू विक्रीचा पूर आला आहे. त्यामुळे गावागावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे बंद करून वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने आज बुधवारी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार तालुक्यात दोन पोलिस ठाणे आहे. असे असतांना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले आहेत. त्यामध्ये वरली मटका, तितली भवरा तसेच अवैध देशी व विदेशी दारूची विक्री सुद्धा राजरोसपणे सुरू आहे. या धंद्याच्या माध्यमातून पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असल्याचे समोर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोराखेडी पोलिस ठाण्यात ठाणेदार, बीट अंमलदार यांच्यात जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. याची सोशल मीडिया व प्रेस मीडियाच्या माध्यमातून तालुकाभरात चर्चा झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरांवर, अवैध धंदेवाल्यांवर पोलिस प्रशासनाचे वचक कमी झाला आहे.

तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अवैध धंदे व अवैध दारू विक्री सात दिवसाच्या आत बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन मामलकर, साहेबराव डोंगरे, गणेश पाटील, सलीम चुनेवाले, विजयसिंग राजपूत, उखा चव्हाण, विलास पाटील, महेंद्र गवई, प्रकाश बस्सी, कैलास गवई, अभिजीत खाकरे, कैलास पाटील, तुळशीराम नाईक, विजय सुरडकर, शिवाजी हरमकार, रवी पाटील, श्रीकृष्ण खराटे, अमर कुळे, मिलिंद जैस्वाल, ईसा शा, अरविंद पाटील, योगेश महाजन, प्रणवसिंग परमार, स्वप्नील नारखेडे, दशरथ राठोड यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...