आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंदे:शहरामध्ये सुरु असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करा ; आझाद हिंदच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अवैध धंदे त्वरीत बंद करावे, बुलडाणा शहरामध्ये अन्याय अत्याचार, विनयभंग, लूटमार,रोड राँबरी, हल्ला अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर पोलिस विभागाकडून नियंत्रण आणावे अन्यथा रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड,आझाद हिंद, बहुजन महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज ३१ मे रोजी तहसीलदार जाधव यांना निवेदनातून देण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यामध्ये महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, विनयभंग, लूटमार ,रोड दरोडे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील शिवाजी शाळा परिसरासह जांभरुण रोड, एकता नगर मधील नाट्यगृह, लद्धड हॉस्पिटल मागील पटांगण या ठिकाणी या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. तर नुकताच २५ मे रोजी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅड.सतीशचंद्र रोठे यांच्यावर शिवाजी शाळेसमोरील परिसरात प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व घटनांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज ३१ मे रोजी तहसीलदार जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलिस आयुक्त यांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी आझाद हिंद संघटनेचे मो.जावेद मौला, मो.सोफीया, मिर्झा नवाझ बेग, सुरेखा निकाळजे, आशा गवई, प्रमिला सुशिर, रेणुका जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...