आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांची हेळसांड थांबवून मुबलक औषधी पुरवठा करण्यात यावा, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार संग्रामपूर तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णालयात वरवटबकालसह परिसरातील बावनबीर, एकलारा, काटेल, कोलद, रिंगणवाडी, दुर्गादैत्य आदी आदिवासी गावातील शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब नागरीक उपचारासाठी येतात. परंतु त्यांना आरोग्य सुविधा दिली जात नसल्याची ओरड होत आहे. त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नैसर्गिक मुत्यू, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे मृतदेह श्वविच्छेदना अभावी पडून राहतात. तसेच गोरगरीब रुग्णांना औषधी न देता कर्मचारी त्यांना अपमानास्पद वागणुक देतात. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस चेतन बकाल, आशिष बकाल, सौरभ टाले, मनोज बकाल, अंकुश बकाल, गणेश पाटील, सागर बकाल यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.