आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:आव्हा शिवारातील दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

मोताळा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आव्हा शिवारातील देशी दारू दुकानात आलेल्या ग्राहकाला हॉकी रॉडने बेदम मारहाण करणाऱ्यावर कारवाई करून अटक करण्यात यावी व दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी महिलांच्या वतीने गुरुवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आव्हा शिवारातील देशी दारूच्या दुकानात उऱ्हा येथील व्यक्तीला दुकानदाराकडून मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. याबाबत धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक न केल्याने गुरुवारी अस्तित्व महिला संघटनेच्या वतीने प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात ग्राहकाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करून अटक करण्यात यावी.

तसेच दारू दुकान बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिलांकडून पिंपळगाव देवी ते मलकापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धामणगाव बढे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे, मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, तहसीलदार सारिका भगत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु महिला मागणीवर ठाम असल्याने दारू दुकान तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...