आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची मागणी

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसापासून शेगाव शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज ११ मे रोजी मुख्याधिकारी जयश्री काटकर-बोराडे यांची भेट घेवून केली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा चक्क चार दिवसानंतर होत आहे. एकीकडे अंगाची लाही-लाही करणारे प्रखर ऊन तापत असल्यामुळे अगोदरच त्रस्त झालेले शहरवासी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हैराण झाले आहेत. उन्हाच्या चटक्या सोबत शहर वासीयांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी जयश्री काटकर-बोराडे यांच्याकडे केली आहे.

त्यावर मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी लवकरच शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा पूर्ववत करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या तत्काळ दूर करून येत्या दोन चार दिवसांत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन शहराचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत कसा होईल, याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश शिंदे शैलेश डाबेराव, आशिष गणगणे, योगेश पल्हाडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश पटोकार यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...