आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा; काँग्रेस महिला आघाडीची मागणी

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात काँग्रेस महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त मुख्य अधिकारी जयश्री काटकर बोराडे यांना भेटून शहराचा पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली.

शेगाव शहरात भर उन्हाळ्यात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पालिकेत नवीनच बदलून आलेल्या जयश्री काटकर-बोराडे यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या १० मे रोजी पालिकेत दाखल झाल्या. पाणी प्रश्नावर नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांनाजिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस तथा महिला चिकित्सक डॉ.शबनम शेख, कविता राजवैद्य, स्नेहल दाभाडे यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेसच्या अनेक महिलांनी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची भेट घेतली.

यावेळी शहरात पाणी पुरवठा अनियमित चार ते पाच दिवसाआड होत असल्याने शहरवासीयांना विशेषत: महिलांना होत असलेल्या त्रासाची कल्पना महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. शबनम शेख यांनी मुख्याधिकारी काटकर यांना दिली. तसेच गटार योजनेतील ड्रेनेज पाइप अनेक भागातील शौचालयाचे पाइप जोडण्यात आले नसल्याने ते उघड्यावर वाहत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी समस्या जाणून घेत लवकरच शहराचा पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी महिला काँग्रेस आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...