आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वधर्मीय शिवप्रेमींच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढून राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. प्रसाद लाड, आ. मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी शहर बंदचे आवाहन केले होते. या बंदला सर्वधर्मीय शिवप्रेमींसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, काँग्रेस सेवादल, शिवसंग्राम संघटना, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पीरिपा, मनसे, छावा संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या नेत्यांनी पाठिंबा देत सहभाग दर्शवला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातून निषेध मोर्चा काढून राज्यपालांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. चिखली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भगवान बाबा चौक, अहिंसा मार्गावरून जुनी नगर परिषद चौकातून जाऊन बस स्थानक चौकात मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी डॉ. रामप्रसाद शेळके, गोविंदराव झोरे, उद्धव मस्के, गणेश सवडे, दीपक बोरकर, अर्पित मिनासे, हाजी सिद्दीक शेट मिर्चीवाले, काशिफ कोटकर, संतोष खांडेभराड, विष्णू रामाने, बाळराजे देशमुख, सुनील शेजुळकर आदींनी भगतसिंग कोश्यारी, मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याबद्दल निषेध नोंदवला. बंद यशस्वी करण्यासाठी राजेश इंगळे, संतोष राजे जाधव, लक्ष्मण कव्हळे, मुशीर खान कोटकर, बंडू डोळस, दत्ता काळे यांनी आवाहन केले. यावेळी आकाश कासारे, जहीर पठाण, अजमत खान, नीलेश गीते, राजीव सिरसाट, प्रकाश बस्सी, अजय शिवरक, कदीर शेख, हनिफ शाह, गणेश बुरकुल, अतिश खराट आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.