आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची बॅटींग:सिंदखेडराजा तालुक्यात पावसाची दमदार बॅटींग, शेतकऱ्यांना दिलासा

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काही भागात जवळपास दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर काल बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे तालुक्यातील अर्ध्या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

मागील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पिकांना पोषक असा पाऊस पडल्यामुळे सर्व शेतशिवारं चांगलीच बहरलीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होता. परंतु मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली होती. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्यांचेही डोळे आभाळाकडे लागले होते. परंतु उशिरा का होईना, बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे अवघ्या अर्ध्या तासांत शहरातील सखोल भागात पाणी साचले होते.

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वादळी वारा व दमदार पावसामुळे नशिराबाद शिवारातील तीस शेतकऱ्यांचे आठ ते दहा एकरातील शेडनेट उध्वस्त झाले आहेत. शेडनेट मधील पिकांना फटाका बसला नसला तरीही शेडनेट फाटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे लोखंडी पाइप वाकले आहेत. या बाबतची माहिती मिळताच आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नशिराबाद येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानीचा सर्वे करून अहवाल पाठवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार सुनील सावंत,तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, महसुलाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...