आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदान:महाजन विद्यालयात व्याख्यानमालेसह विद्यार्थी करिअर गायडन्स कार्यक्रम

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयात गणेश बहिशाल व्याख्यानमालेत तिसरे पुष्प अर्पण करताना विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे सहसचिव, प्राचार्य एम. पी. कुयटे, तर प्रमुख मार्गदर्शक श्री साई अकॅडमीचे संचालक प्रमोद कौसकर आदी मान्यवर उपस्थित होते. मागील ४६ वर्षांची परंपरा असलेल्या या गणेश बहिशाल व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा, परीक्षा व उपक्रम तसेच अनेक तज्ञ, अनुभवी व अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्याच्या दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करताना साई अकॅडमी मोताळ्याचे संचालक प्रमोद कौसकर यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, अभ्यास पद्धती व अभ्यासाचे तंत्र याविषयी माहिती दिली. सोबतच भविष्याच्या दिशा निश्चित करताना विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवे बरोबरच पोलिस, सैन्य भरती आदींमधील नोकरीच्या संधी याबाबतही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. विजय पुंडे यांनी केले. दीपा सोळंके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ह. का. गिरी, रमेश इंगळे यांचे योगदान राहिले.

बातम्या आणखी आहेत...