आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या;:हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या; अपेक्षित गुण न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अनुराधा नर्सिंग कॉलेजला तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने खासगी हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अनुराधा नगरात घडली. शिवशंकर भास्कर लाड २१ वर्ष रा.दिग्रस बु,ता. देऊळगावराजा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवशंकर हा चिखली येथील अनुराधा नर्सिंग कॉलेजला तृतीय वर्षाला शिकत होता. कॉलेजच्या जवळ असलेल्या एका खासगी हॉस्टेल मध्ये रूम घेऊन तो राहत होता. गुरूवार रोजी त्याला पुढील वर्षाचा फॉर्म भरायचा होता. त्यासाठी वडिलांनी त्याला सकाळी पैसे देखील पाठवले होते. मात्र, दुपारी लागलेल्या निकालात त्याला अपेक्षित गुण न मिळाल्याने तो तणावात होता. दरम्यान, दुपारी १ पर्यंत त्याच्या खोलीवर त्याचे मित्र होते.

बातम्या आणखी आहेत...