आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कार पलटी झाल्याने विद्यार्थी ठार

देऊळगाव मही2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चार ते पाच पलट्या खात रस्त्याच्या बाजूला शंभर फूट अंतरावर जाऊन पडली. या अपघातात एक २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता चिखली-मेहकर रोडवरील कोलारा फाट्यासमोरील गुरुकुल शाळेजवळ घडली.

येथून जवळच असलेल्या डिग्रस बु. येथील अजय बद्रीनाथ आंधळे वय २२ हा युवक चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत होता. दरम्यान शनिवारी सकाळी तो एमएच १४ बीएफ ६७२३ या क्रमांकाची मित्राची कार घेऊन तो मेहकरला गेला होता.

तेथून परत येताना गुरुकुल शाळेजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार पाच पलट्या खाऊन रस्त्याच्या बाजूला शंभर फूट अंतरावर जाऊन पडली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने अजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...