आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल:ऑटोच्या अपघातात विद्यार्थी ठार

अंढेरा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ऑटो रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात चौदा वर्षीय विद्यार्थी ठार झाला तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगर फाट्यावर घडली. ऑटोचालक दारुच्या नशेत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामनगर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी मेराचौकी, भरोसा येथील शिवशंकर विद्यालयात जातात. रामनगर येथील गौरव उर्फ अनिकेत अरुण शितोळे (१४) हा आठवीतील विद्यार्थी रामनगर ते मेराचौकी ऑटोने ये-जा करत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तो एमएच २८/ बीए ०८३० या क्रमांकाच्या ऑटोने घरी येण्यासाठी निघाला. ऑटोवर चालक म्हणून मेरा खुर्द येथील शंकर रामभाऊ जंगले हा होता. रामनगर फाट्यावर येताच चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ऑटो उलटला. अपघात घडताच ऑटोतील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केली.

मुलांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अनिकेत शितोळे हा ऑटोखाली दबलेला दिसून आला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. गंभीर अवस्थेत त्याला चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पालकांनी ऑटोतील काही विद्यार्थ्यांना विचारणा केली असता ऑटो चालक शंकर जंगले हा दारुच्या नशेत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी शुभम शितोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑटो चालक जंगले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...