आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनएसएस सारख्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना समूहामध्ये राहून स्वत:ची कामे स्वता करावी लागतात. तसेच समूहांमध्ये विभागून दिलेले कार्यक्रम देखील पार पाडावी लागतात. त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतात, असे प्रतिपादन अंनिसच्या कार्यकर्त्या प्रतिभा भुतेकर यांनी केले.
अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने चिखली तालुक्यातील रानअंत्री येथे आयोजित एनएसएस कॅम्प मध्ये व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्यातील कलमांचे स्पष्टीकरण देत कायद्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली. कलमाच्या अनुषंगाने येणारे श्रद्धा-अंधश्रद्धा म्हणजे काय, अंगात येणे काय असते, खरच अंगात येते का, अंगात येण्या मागील कारणे भारतीय समाज पद्धतीमध्ये महिलांच्या अंगात जास्त काय येते, यामागील कारणे समजावून सांगितली. कुठल्याही व्यक्तीमध्ये दैवी शक्ती नसते किंवा अलौकिक शक्ती नसते. चमत्कार करण्याची शक्ती नसते तर वरिष्ठांकडून आलेल्या संस्कारातूनच हा भ्रम पसरवला जातो.
वास्तविक अंगात येण्यामागे मागे म्हणजे ढोंग असू शकते, एखादी बिमारी असू शकते. किंवा मेंदूने स्वीकारलेल्या सूचनेमुळे अंगात येत असते, असे त्यांनी सांगितले. श्रद्धे मधूनच अंधश्रद्धेची बीज पुरवल्या जातात. त्यामुळे मानवी मेंदू हा गुलाम बनून व्यक्ती हातचलाखी किंवा वजि्ञान प्रयोग यासारख्या चमत्कारावर विश्वास ठेवून शोषणाला बळी पडतो. अशा शोषणाला बळी न पडता जादूटोणाविरोधी कायद्याचा अभ्यास केल्यास असे फसवणारे बुवा बाबा समाजातील नक्कीच नष्ट होतील. तसेच मानवी समाजाचे, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण कुठेतरी थांबून समाज शिक्षणक्षम होईल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.