आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:जातपडताळणी कार्यालयात पालकांसह विद्यार्थ्यांची हेळसांड ; मनमानी कारभार सुरु

मोताळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा येथील जातपडताळणी कार्यालयात जातपडताळणी साठी गेलेल्या पालकांसह विद्यार्थ्यांना पावतीसाठी तासंतास थांबवण्यात येत आहे. शिवाय आवश्यक नसलेल्या कागदपत्रांसाठी जातपडताळणी प्रकरणे परत दिले जात आहे. त्यामुळे पालकासह विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा, अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत.

प्रकरण दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी व त्यांचे पालक शंभर ते दीडशे किलोमीटर वरून जातपडताळणी कार्यालयात येतात. परंतु या कार्यालयात प्रकरण सादर केल्यानंतर त्यांना दोन ते तीन तास पावतीसाठी थांबविण्यात येत आहे. काही परिचित लोकांचे प्रकरण क्रमवारीत पुढे घेऊन त्यांना प्राधान्य देत त्यांना लवकर पावती देण्यात येत आहे. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. जातपडताळणी साठी आलेल्या पालकांना कर्मचाऱ्यांकडून सन्मानजनक वागणूक देण्यात येत नाही. वास्तविक पाहता जातपडताळणी साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी ही कार्यालयात ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. त्यामध्ये लागणाऱ्या कागदपत्रात रहिवासी दाखल्याची कोठेही उल्लेख नाही. असे असतानादेखील रहिवासी दाखल्यासाठी जातपडताळणी प्रकरणे परत पाठवले जात असल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जातपडताळणी कार्यालयात अनागोंदी कारभार थांबवून सर्वांना समान वागणूक देत क्रमवारी अर्ज घ्यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...