आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पातुर्डा येथे जिल्हा परिषद उर्दू उच्च माध्यमिक शाळेत बाल आंनद मेळाव्यात खरी कमाई करण्यासाठी प्रयत्न करुन तीन हजार रुपयांची कमाई केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही कमाई भविष्यासाठी आदर्श ठरणार असल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष मौलाना शेख अजरोद्दीन यांनी सांगितले. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष मौलाना शेख अजरोद्दीन शेख रयासोद्दीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मिठाई, नमकीन ज्युसचे लावलेले स्टाॅल, दुकान सर्वांचे आकर्षण ठरले होते.
या बाल आनंद मेळाव्यात जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत सहभाग नोंदवला. बंगाली मिठाई, गाजर हलवा, दुधिया हलवा, आलू पोंगे, पोंगा पंडीत, पोहे, गुलाब जामुन, विविध फळांचा ज्युस, कोकते समोसे, मुगाचे भज, कचोरी, मूगवडे, विविध धान्याचे पापड, साबुदाणा वडा, मिरची भजीये, विदर्भ मेवा बटर, जर्दा, पाणी पुरी, चिवडा, वटाणे, हरबरा, छोले आदी विविध पदार्थ बनवण्यात आले होते. यासाठी ५ हजार रुपये खर्च आला तर विविध मिठाई पदार्थांच्या विक्रीतून ३००० हजार रुपये नफा झाला.
ही रक्कम विद्यार्थी व विद्यार्थिनी मुख्याध्यापक मो. शकील अहेमद पीर मोहम्मद यांना सुपूर्त केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मौलाना शेख अजरोद्दीन, मीर कुर्बान अली, रकिबोद्दीन काझी, फकरोद्दीन काझी, मुफ्ती अ. रहेमान, शेख करिम, मो. मतीन, मो. फरहान देशमुख, शहेनाज परवीन, नाहिद अख्तर, आमेना बी, मो. यासिन, मो. आसिफुर्र रहेमान, शेख नसिम, जावेद एकबाल, अमीर शाह, इरफानोद्दीन काझी, मो. हस्सन यांच्यासह पालक उपस्थित होते.
अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळते
असे कार्यक्रम बहुतांश शाळेत घेतले जातात. स्काऊट, गाईडच्या माध्यमातुनही खरी कमाईला महत्व असते. परंतु, ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून काहीतरी उपक्रम राबवून तीन हजाराचे उत्पन्न मिळवणे ही साधी बाब नाही. ती सुध्दा खाण्याच्या वस्तू विकून ही मिळवलेली कमाई आहे. वास्तविक बालकेही मिठाईचे शौकीन असते परंतु त्यांनीच मिठाई विकून स्वतःवरील नियंत्रण ठेवणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष मौलाना शेख अजरोद्दीन म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.