आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव:चर्मकार समाजातील विद्यार्थी; सेवानिवृतांचा सत्कार

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गुरु रविदास महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव तथा समाजातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समारंभ २१ ऑगस्ट रोजी अमृत इंग्लिश स्कूल येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. ओ. शेगोकार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अनिता डवरे, अरविंद शिंगाडे, उत्तमराव पद्ममणे, हिरालाल बोर्डे, शीतल प्रितम माळवंदे, डॉ.गोपाल गव्हाळे, ज्ञानदेवराव चिमणकर, अंबादास उंबरकर, पांडुरंग सावरकर, काशीराम डांगे, सोपान सावरकर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर राज्याचे कृषि मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रास्ताविक श्रीराम घोपे केले. यावेळी उत्तमराव पद्ममणे, वैभव डवरे, अरविंद शिंगडे, गजानन ढबाले यांनी मार्गदर्शन केले. तर डिझायर कोचिंग क्लासचे संचालक दामोदर दांडगे यांनी उच्च शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुभाष शिंदे, राम पानझाडे, मोहन भदेले, बळीराम शेगोकार, शुभांगी इंगळे, रेखाताई निंबोळकर, लक्ष्मण वानखडे, सूर्यकांत निंबोळकर, मनोज पानझाडे, गणेश पानझाडे यांनी परिश्रम घेतले. संचालन रमेश वानखडे यांनी तर आभार श्याम माळवंदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...