आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सदैव आदरपूर्वक सन्मान करावा

देऊळगावराजा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्ये असते. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सदैव आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनल रामप्रसाद शेळके यांनी केले.

येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थाध्यक्षा डॉ. मीनल शेळके, प्राचार्य आदेश शर्मा व आदी मान्यवर उपस्थित होते. भावी पिढी समर्थपणे बनवण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे हा या दिनाच्या मुख्य उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस सन १९९४ पासून १०० पेक्षा जास्त देशांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने ५ सप्टेंबरला राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या भूमिका विचार व कृतीतून पार पडल्या. तर मुलांनी शिक्षकांसाठी काही स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धा खेळताना एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांमध्ये संचारला होता.

विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धांसाठी त्यांचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरूत्तानी येथे झाला. तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार प्रदेशात त्यांची प्रशंसा झाली. तसेच गुरु व शिष्य संबंधांमधील पवित्र भावना, लोप पावत असून या संबंधांमधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा केला जातो, असे डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी दुनगहू यांनी केले, तर आभार शलाका खरात यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...