आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप:विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच माणूसपणाचे धडेही द्यायला हवे, प्रा. कमलेश खिल्लारे यांचे प्रतिपादन

देऊळगाव मही7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्त मार्क म्हणजे यश आणि कमी मार्क म्हणजे अपयश असं होत नसत. कारण विज्ञान सांगते ज्याचा मेंदू शाबूत तो बुध्दीमान असतो. तेव्हा स्वतःला ओळखा आणि स्वतःच्या सुरात गाण म्हणायला शिका.आनंद शिंदे, सचिन तेंडुलकर यांना कोणी किती शिक्षण झाल हे विचारत नाही. त्यांनी झोकून देऊन आपल काम केल आणि स्वतःला सिध्द केल. गुणवत्ता केवळ मार्कांवर अवलंबून नसते ती कुठुन ही बाहेर पडते, गायकाच्या कंठातून, चित्रकाराच्या कुंचल्यातून, प्रबोधनकाराच्या वाणीतून, खेळाडूच्या खेळातून, समाजकार्यातून तेव्हा शाळेने आता डॉक्टर, इंजिनिअर हे छाप्याचे तंत्र बंद करत विद्यार्थ्यांना स्वतःला ओळखण्याची कला शिकवली पाहिजे. शाळेतील पाठ्यक्रम पुर्ण करताना शाळेच्या धड्या सोबत चांगले आयुष्य जगण्यासाठी माणूसपणाचा धडा ही शिकवला पाहिजे असे विचार चोखा सागर नामकरणाचे शिल्पकार, प्रा. कमलेश खिल्लारे यांनी केले.

येथील सहकार विद्या मंदिरामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी विचारपिठावर डॉ. अलका गोडे, बुलडाणा अर्बनचे विभागीय अधिकारी सिरसाट, बुलडाणा अर्बन व्यवस्थापक लोखंडे, प्राचार्य खरात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्याच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिक्षक मंगेश यांनी मुलांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत शाळेचे नाव मोठ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य खरात यांनी परिक्षेला घाबरू नका विश्वासाने समोर जा सांगत पेपर कसा सोडवावा यासाठी महत्वपूर्ण सुचना केल्या. डॉ. अलका गोडे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत आपण सकारात्मक असलो तेव्हाच यशस्वी होता येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळेकर यांनी तर आभार प्रदर्शन खेडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास शिंगणे, रोहित पऱ्हाड,पडघान, शेख आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...